शहरातील कसाली मोहल्ल्यात घर कोसळले…महिला व मुलगी जखमी, संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान


अमळनेर/प्रतिनिधी. शहरातील कसाली मोहल्ला येथे अचानक हवा वादळ आणि पाऊस आल्याने घर कोसळून महिला व मुलगी जखमी झाल्याची घटना २८ रोजी सायंकाळी घडली.फिरोज खा शमशेर खा पठाण यांची पत्नी सायंकाळी स्वयंपाक करत असताना वादळ व पाऊस मुळे अचानक घर कोसळले धाब्याची माती व लाकडे कोसळल्याने स्वयंपाकचे गरम पाणी पडून मुलीचा हात भाजून दुखापत झाली. व घरातील वस्तूंचे नुकसान झाले. जखमी मुलगी मुस्कानबी फिरोज खा (वय ९) हिला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घरातील वस्तू व इतर मिळून सुमारे २० ते ३० हजाराचे नुकसान झाले आहे. शहर तलाठी सोनवणे यांनी पंचनामा केला.