विधानसभेच्या २८८ जागा लढवणार. -मनोज जरांगे यांचा थेट इशारा..

0

राज्यातील सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले पाहिजे, सगे सोयरे संदर्भात काढलेल्या अधिसूचनेची अंमलबजावणी सरकारने केली पाहिजे. आम्हाला राजकारण करायचे नाही, परंतु आमची मागणी मान्य न झाल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत २८८ जागांवर उमेदवार उभे करायचे किंवा २८८ उमेदवार पाडायचे, हे सामुहिकरित्या ठरवणार असल्याचा थेट इशारा मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे-पाटील यांनी रविवारी परभणीतील सभेतून दिला. यामध्ये सर्व जाती-धर्माचे उमेदवार असतील, असेही मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले. मराठा आरक्षणासाठी सुरू झालेल्या संवाद रॅलीतील पहिली जाहीर सभा हिंगोली जिल्ह्यात घेण्यात आली. यानंतर परभणीत शांतता रॅलीसाठी आलेल्या जरांगेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

यावेळी त्यांना विधानसभा निवडणुकीबाबत प्रश्न विचारण्यात आले. त्यावर जरागे म्हणाले, आपल्याला राजकारणात जायचे नाही. राजकारण ही काही आपली वाट नाही. माझा जनचळवळीवर जास्त विश्वास आहे. या चळवळीमुळेच माझ्या समाजालाखूप काही मिळाले. आज ५७ लाख नोंदी सापडल्या आहेत. पण निवडणुकीत उतरण्याची वेळ आली तर राज्यात २८८ उमेदवार उतरवणार. त्यात सर्व जातींच्या उमेदवारांचा सहभाग असेल. आताच्या सरकारने दोन उपमुख्यमंत्री देण्याची प्रथा पाडली. त्यानुसार आम्हीदेखील सर्व समाजाचे ७-८ उपमुख्यमंत्री देऊ. सर्व जाती-धर्माचे लोक राजकारणाच्या प्रवाहात आले तर ते आपापल्या जातींना न्याय देतील. त्यामुळे राज्यातील जातीवाद बंद होईल. मुस्लिम, दलित, धनगर, रजपूत आदी सर्व जातींचे उपमुख्यमंत्री करण्यात येतील, असे मत मनोज जरांगे यांनी मांडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!