जळगावात मुस्लिम समाजा तर्फे विशाळगड हल्ल्याचा तीव्र निषेध सह कारवाई व नुकसान भरपाई ची मागणी..

जळगाव/प्रतिनिधि
विशाळ गडावर 14 जुलै रोजी झालेल्या हिंसक वातावरणामुळे अल्पसंख्यांक समाजाची मस्जिद, दर्गा व घरातील कुटुंबीयांचे नुकसान केले त्या सर्वां वर कायद्यानुसार कडक कारवाई करा व नुकसान झालेल्यांना शासनाने नुकसान भरपाई द्या अशी एक मुखी मागणी जळगाव शहरातील विविध राजकीय व सामाजिक कार्यकर्ते जिल्हाधिकारी मार्फत राज्यपाल, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व अल्पसंख्यांक आयुक्त महाराष्ट्र यांच्या कडे केलेली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांना पुषांजली
निवेदन देण्यापूर्वी सर्व समाजाचे कार्यकर्ते श्री छत्रपती शिवाजी महाराज छत्रपतीना पुष्पांजली वाहून त्यांच्या राज्यात त्यांच्या नावाने जे काही लोक हिंसक वातावरण तयार करून अल्पसंख्यांकांचा नुकसान करीत आहे त्यांना सूदबुद्धी देव अशी प्रार्थना करून जिल्हाधिकारी कार्यालय गाठले.
जिल्हाधिकारी यांना निवेदन
जिल्हाधिकारी हे मीटिंगमध्ये व्यस्त असल्याने उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांनी निवेदन स्वीकारले व आपल्या भावना शासनाला कळविण्यात
येईल असे आश्वासन दिले.
शिष्टमंडळात यांचा होता समावेश
फारुख शेख, सय्यद चांद, मजहर पठाण, अहमद सर, बाबा देशमुख, सलीम इनामदार, नदीम काझी, फिरोज शेख, जमील शेख, मुजाहिद खान, अन्वर खान, ताहेर शेख, शेख इरफान नुरी, इद्रिस कादिर, कौसर काकर, युसुफ खान, मौलाना उमेर,राजा मिर्झा, मोहम्मद अमीर, शेख तनवीर, जफर मिर्झा, शिबान फाइज, कासीम उमर,निजाम शेख, शरीफ शेख, सलमान खाटीक, अनिस पटेल, सादिक खान , मुबारक मुलतानी , मोहम्मद सादिक बॉण्ड, एडवोकेट अय्युब खान, मौलाना हुसेन, मौलाना हुसेन साबरी आदी होते.