इराणी बांधवांच्या मिरवणुकीत सामाजिक कार्यकर्ते आरीफ भाया व इराणी समाजाचे प्रमुख अख्तर इराणी यांच्या वतीने पी आय देवरे यांचा सत्कार.

अमळनेर/प्रतिनिधी
अमळनेर शहरातील इराणी बांधवां मोहरम निमित्ताने मातम चा कार्यक्रम आयोजित करतात ह्या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद आरिफ भाया यांनी हिंदू मुस्लिम समाजाच्या वतीने अमळनेर नगरीचे पोलिस निरीक्षक विकास देवरे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी इराणी समाजाचे प्रमुख अख्तर इराणी उपस्थित होते
शहरातील सुभाष चौक येथे दरवर्षीप्रमाणे इस्लामी महिन्याच्या १० तारखेला मोहरमच्या निमित्ताने इराणी बांधवांची मातम मिरवणुक काढण्यात येते संपूर्ण पुरूष महिला सह पाल्य ही एकत्रित जमतात आणि चाकूने आपल्या शरीरावरील रक्त काढून मातम करतात ह्या कार्यक्रमात सर्व समाजातील बांधव शेकडोंच्या संख्येने मातम पाहायला येतात सदरील कार्यक्रमात पोलिस निरीक्षक विकास देवरे व त्यांची टिम हजर राहून चोख बंदोबस्त ठेवला या बद्दल इराणी समाजाचे प्रमुख अख्तर इराणी व सामाजिक कार्यकर्ते आरीफ भाया यांनी हिंदू मुस्लिम समाजाच्या वतीने पी आय देवरे यांचा सत्कार केले.