आता लाडक्या भावांसाठीही योजना-पदवीधारकाला १० हजार, डिप्लोमाधारकाला ८ हजार, १२वी पास झालेल्यांना दरमहा ६ हजार रुपये मिळणार.

0

24 प्राईम न्यूज 18 Jul 2024. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील महायुती सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत पात्र महिलांना राज्य सरकारकडून दरमहा १५०० रुपये देण्यात येणार आहेत. लोकसभेतील दारुण पराभवानंतर विधानसभेला महिलांची मते मिळावीत या उद्देशानेच राज्य सरकारने ही योजना आणल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. त्यातच लाडक्या बहिणींचा विचार केला, परंतु लाडक्या भावांचे काय, असा सवालही विरोधकांकडून केला जात होता. त्यावर विठ्ठल-रखुमाईच्या शासकीय पूजेसाठी पंढरपुरात असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रसारमाध्यमांनी बुधवारी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी युवा कार्य प्रशिक्षण योजनेची घोषणा केली. या योजनेंतर्गत १२वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ६ हजार रुपये, पदविका उत्तीर्ण असणाऱ्यांना ८ हजार आणि पदवी उत्तीर्ण असणाऱ्यांना दरमहा १० हजार रुपये देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. युवा कार्य प्रशिक्षणासाठी असा अर्ज करता येईल कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्त यांच्याकडून ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी सोय करण्यात येईल. • १२वी, आयटीआय, पदविका, पदवी आणि पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता असलेल्या तरुणांना ऑनलाईन नोंदणी करावी लागेल. • योजनेसाठी उमेदवार १८ ते ३५ वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहे.

  • उमेदवार १२वी उत्तीर्ण/आयटीआय / पदविका/ पदवी आणि पदव्युत्तर असावा. शिक्षण सुरू असणाऱ्या विद्यार्थ्यांना योजनेचा लाभमिळणार नाही.
  • उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा.

● उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे.

  • इच्छुक उमेदवारांनी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्याhttps://rojgar. mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे.
  • प्रशिक्षण कालावधी पूर्ण केल्यानंतर संबंधित उद्योग किंवा आस्थापनेकडून विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!