वैज्ञानिक अधिकारी पदी निवड झाल्याने मंत्री अनिल पाटील यांनी केला रिना माळी यांचा सत्कार..

——–
कळमसरे ता. अमळनेर —- येथील
कु.रिना मधुकर माळी यांची महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागातर्फे वर्ग -3 प्राथमिक आरोग्य केंद्र चहार्डी ता.चोपडा येथे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी मलेरिया पदी निवड झाल्याने मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी रिना माळी यांच्या घरी जात तीचे कौतुक व सत्कार केला.
रिना माळी स्पर्धा परीक्षेत सरळ सेवा अंतर्गत डिसेंबर 2023 मध्ये ह्या पोस्टची परीक्षा तिने दिली होती. यात तीला यश मिळाले असून तिची प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी मलेरिया म्हणून चोपडा तालुक्यातील चहार्डी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात निवड झाली आहे. मंत्री अनिल पाटील यांनी तिच्या घरी जावून सत्कार केला. यावेळी मंत्री अनिल पाटील यांचे स्वीय सहाय्यक एल टी पाटील , राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष भागवत पाटील, उपसरपंच पिंटू राजपूत, माजी ग्रामपंचायत सदस्य आबा महाजन अशोक चोधरी, भूषण पाटील, दिनेश राजपूत ,सचिन बेहरे , बाबुलाल पाटील,देविदास माळी, मधुकर माळी, डॉ . कपिल महाजन, बाळासाहेब शिसोदे, स्वप्नील माळी आदी उपस्थित होते.