फारूक शेख यांचा अटक पूर्व जामीन मंजूर.. अपहार किंवा शासनाची फसवणूक नाही परंतु ईद गाह ट्रस्ट लाभार्थी – सत्र न्यायालय,जळगाव चे आदेश…

जळगाव (प्रतिनिधि) फारुक शेख यांची अटकपूर्व जामिनावर सुटका करण्यासाठी चांगली व पुरेशी कारणे कागदपत्रा सह रेकॉर्ड वर ठेवली आहेत तर फिर्यादी, तपास यंत्रणा व तक्रारदार यांनी जामिनाला विरोध करण्यासाठी जी कारणे दिली आहेत ती स्वीकाहर्य नाहीत म्हणून शेख यांचा अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात येत असल्याचे आदेश अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.बी. बोरा यांनी दिले.
अटकपूर्व जामिनावर न्यायालयाने १७ मुद्दे द्वारे आपले निरीक्षण नोंदविले त्यात ईदगाह व कब्रस्तान चे शेख हे सचिव या जवाबदार पदावर आहेत व ती जबाबदारी त्यांनी घटना व ठरावाप्रमाणे पार पाडली आहे. ट्रस्ट च्या ठरावा नुसारच महानगरपालिके सोबत ट्रस्टच्या लेटरहेडवर, ट्रस्टच्या शिक्या चा वापर करून स्वतः च्या सहीने पत्रव्यवहार केला आहे,(खोटे,बनावट नव्हे)
कोविडमध्ये मृत पावलेल्या १११ व्यक्तींबाबत मनपाकडून १,८६,४८०/-रुपये मिळवून ट्रस्टच्या बँक खात्यात जमा केलेले आहे.
शेख यांनी वैयक्तिक किंवा स्वार्थासाठी पैशाचा वापर केलेला नाही व हे पैशे ट्रस्ट च्या अकाउंट मध्येच आहे म्हणून *मनपाकडून मिळालेल्या निधीचे खरे लाभार्थी मुस्लिम ईदगाह व कब्रस्तान ट्रस्ट आहे.* असे स्पष्ट मत न्यायालयाने मांडले आहे.
तसेच पुढे म्हटले आहे की तक्रारदार यांनी वक्फ मंडळा कडे तक्रार करणे आवश्यक होते. या प्रकरणी मनपा ची सुध्दा फसवणुकीची कोणतीही तक्रार नाही, तीन मृतांच्या नातेवाईकांनी खर्च केल्याचे प्रतिज्ञापत्र तक्रारदारा मार्फत दाखल केले त्यांनी सुद्धा ट्रस्ट कडे जाऊन खर्चाची प्रतिपुर्ती ची मागणी केलेली नाही.या सर्व कागदपत्रांवरून शेख यांचा अर्ज मंजूर करण्यात येत असल्याचे नमूद आहे.
*शेख यांच्या विरोधात काय होती तक्रार ?*
फारुक शेख यांच्या विरोधात मुश्ताक शेख (सालार) यांनी कोविड काळात १११ मृत व्यक्तींचे दफन विधी जळगाव इदगाह येथे करून खोटी बिले तयार केली व महानगरपालिके कडून १,९४,००० रु घेऊन मनपा ची फसवणूक करून रकमेचा अपहार केला अशा आशयाची तक्रार ७ ऑक्टोबर ला दाखल केली होती व त्यावर १० ऑक्टोबर रोजी पोलिसांनी शेख यांची चौकशी करून सर्व कागदपत्रे हस्तगत केली असतांना सुध्दा दोन महिन्या नंतर त्याच तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशन जळगाव येथे ५ डिसेंम्बर रोजी गुन्हा दाखल झाला होता त्यावर ७ डिसेंबर रोजी शेख यांनी जिल्हा सत्र न्यायालया कडून अंतरिम अटकपूर्व जमीन मिळविला होता.त्या अंतरिम अर्जाला न्यायालयाने २४ जानेवारीच्या आदेशानुसार कायम स्वरूपी जामीन ३० हजार रु च्या जातमुचुलक्यावर मंझुर केला आहे.
फारूक शेख यांच्या तर्फे अडव्होकेट प्रकाश बी पाटील यांनी युक्तिवाद करून न्यायालयास कागदोपत्री वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली व सदर ची तक्रार कशा प्रकारे पूर्वग्रह दूषित भावनेने केली आहे त्याचा गोशावारा सादर केला असता त्या वर न्यायालयाने वरील प्रमाणे आपले निरीक्षण नोंदवित आदेश पारीत केले.
सोबत
मा न्यायालयाचे आदेशाची प्रत सविनय सादर