1 ऑगस्ट 2024 रोजी महसूल दिनाचे औचित्य साधुन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माहिती देण्यासाठी कॅम्प चे आयोजन.

0

प्रतिनिधी पिंपळे

दिनांक 1 ऑगस्ट 2024 रोजी महसूल दिनाचे औचित्य साधुन वावडे मंडळ भागातील पिंपळे बुद्रुक सजा या ठिकाणी महसूल पंधरवाड़ा 2024 अंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना बाबत कॅम्प चे आयोजन ठीक 9 वाजता करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मंडळ अधिकारी पुरुषोत्तम शिवाजी पाटील वावडे भाग यांनी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले तर सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील व तंटामुक्त अध्यक्ष निंबा दला चौधरी यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पुजन करून माल्यार्पण केले.
यावेळी महसूल विभागाचे स्वप्निल कुलकर्णी यांनी महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण याविषयी माहिती दिली व मार्गदर्शन केले परिसरातील अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका व वावडे भागातील तलाठी भुपेश पाटील, तलाठी राजेंद्र दाभाडे, तलाठी द्रौपदी पजाई, तलाठी जान्हवी जाधव तसेच कोतवाल पिंपळे बु , कोतवाल आर्डी परिसरातील पोलीस पाटील चिमनपुरी, झाडी, ढेकु चारम शिरसाले बु व खुर्द , पिंपळे खुर्द येथील ग्रामसेवक किरण लंकेश तसेच लोकनियुक्त सरपंच वर्षा युवराज पाटील पिंपळे खुर्द, शिरसाळे येथे सरपंच मनीषा सूर्यवंशी,माजी सरपंच आटाळे सदा बापू पाटील, माजी सरपंच दिनेश पाटील पुरुषोत्तम लोटन चौधरी गोकुळ पाटील ग्रामपंचायत शिपाई ज्ञानेश्वर पाटील व रविंद्र सैंदाणे व मोठ्या संख्येने महिला व ग्रामस्थ उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!