अमळनेरमध्ये साथी गुलाबराव पाटील स्मृती समारंभाचे आयोजन..

0

अमळनेर/ प्रतिनिधी

अमळनेर येथील साने गुरुजी विद्यालयात माजी आमदार आणि शेतकरी नेते साथी गुलाबराव पाटील यांची स्मृती साजरी करण्यात येणार आहे. या वर्षीचा स्मृती समारंभ २२ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात विद्यालयाच्या प्राथमिक विभागाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन सोहळा, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील व्यक्तीला पुरस्कार वितरण, तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यां साठी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले आहे.

वक्तृत्व स्पर्धेचे विषय: आंदोलने शेतकऱ्यांची, परीक्षा सरकारची, समाजवाद काल आज उद्या, बोल की लब आजाद है तेरे, भारतीय संविधान आणि लोकशाहीचे भवितव्य, खरा तो एकची धर्म.

पुरस्कार: विजेत्यांना रोख रक्कम, स्मृती चिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमाच्या माध्यमातून बापूंच्या विचारांना पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे झालेल्या पत्रकार परिषदेत संस्थेचे सचिव संदिप घोरपडे यांनी सांगितले.तसेच पत्रकारांनी खर्चा बाबत विचारलेल्या प्रश्नावर हा सर्व खर्च लोकसहभागातून करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील पाटील,संस्थेचे चेअरमन हेमकांत पाटील,विलास चौधरी,बापुराव ठाकरे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!