अमळनेर तालुका व शहर काँग्रेस कमिटीची बैठक संपन्न.

अमळनेर/प्रतिनिधी. अमळनेर तालुका व शहर काँग्रेस कमिटीची बैठक दि.1 ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी 1.30 वाजता, छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह अमळनेर येथे, काँग्रेस निरीक्षक श्री प्रदीप देशमुख, तालुका प्रभारी श्रीमती अर्चना पोळ, महाराष्ट्र प्रदेश प्रतिनिधी रवींद्र पोळ, प्रदेश प्रतिनिधी श्री ज्ञानेश्वर कोळी, यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. प्रमुख मान्यवरांच्या सत्कारानंतर, तालुका अध्यक्ष बी.के सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले. त्यात महाराष्ट्र प्रदेश प्रभारी श्री रमेश जी चेंनीथाला यांनी, प्रत्येक तालुक्यावर, काँग्रेस तालुका प्रभारी व निरीक्षक आणि त्या तालुक्याचे जिल्हा प्रतिनिधी सह तालुका कार्यकारिणीची सभा घेणे बंधनकारक केली होते. त्यानुसार आजच्या सभेचे आयोजन आहे. निवडणुकीत निवडणुकीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे बी. एल. ए.( ब्लॉक लेव्हल एजंट /असिस्टंट) वर लक्ष केंद्रित केले पाहिजे. कारण मतदाराशी प्रत्यक्ष संपर्क साधणारा, मतदान घरातून काढून मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाणारा, मतदान बरोबर व योग्य प्रकारे होत आहे की नाही यावर लक्ष ठेवणारा, म्हणजे बीएलए व त्याची टीम. ज्या पक्षात बी एल ए टीमने योग्य प्रकारे काम केले असेल तर, त्या पक्षाला समाधानकारक मतदान मिळते व त्या पक्षाचा उमेदवार निवडून येतो. अशी बी एल ए ची महती. श्री सूर्यवंशी यांनी प्रत्येक वार्डावार्डात, व खेड्या खेड्यात, तालुका प्रतिनिधी च्या उपस्थितीत बी एल ए च्या बैठका संपूर्ण तालुका भर लावाव्यात व त्यासाठीच्या कार्यक्रम तालुका काँग्रेस कमिटी राबवणार असल्याचे सांगितले. नंतर संसदेत श्री राहुल जी गांधी यांना जातीसंबंधी बोलणारे, मनुवादी श्री अनुराग ठाकूर यांचा निषेध चा ठराव सूर्यवंशी यांनी मांडला. सभेत आवाजी मतदाराने निषेध ठराव मंजूर, संमत केला गेला. त्यानंतर श्री संदीप घोरपडे यांनी अमळनेर तालुक्याची काँग्रेस पक्षाची सद्य परिस्थिती वर्णन करताना, काँग्रेस पक्षात आता कितीही इच्छुकांनी निवडणुकीत उभे राहण्याची तयारी केली तरी, शेवटी पक्षाने जो उमेदवार दिला त्याचा आम्ही एक दिलाने प्रचार करू व निवडून आणू, अशा आशयाचे प्रतिपादन केले. त्यानंतर तालुका प्रभारी चाळीसगाव स्थित श्रीमती अर्चना पोळ यांनी मार्गदर्शन केले. निरीक्षक श्री प्रदीप देशमुख यांनी मार्गदर्शन करताना अमळनेर मतदार संघात काँग्रेस पक्षाचा जोर हा उमेदवार निवडून आणण्या इतका नक्की आहे. त्यासाठी मुंबई येथे मी स्वतः अमळनेरची बाजू मांडून, महाविकास आघाडीतून अमळनेर विधानसभेची जागा ही काँग्रेस पक्षासाठी सोडण्यास भाग पाडू. असे आश्वासित केले. शेवटचे आभार प्रदर्शनाचे गोड काम बापूसाहेब के.डी पाटील यांनी केले. सभेस बापूसाहेब शांताराम पाटील, गोकुळ आबा बोरसे, भाऊसाहेब मगन पाटील, महेश पाटील, तुषार संधान शिव, विवेक पाटील, रोहिदास पाटील, उत्तम पाटील, विठ्ठल पवार, तुकाराम चौधरी, पार्थराज पाटील, त्र्यंबक पाटील, प्रवीण जैन, प्रताप पाटील, पुणेलाल पाटील, अनिल पाटील मनोहर पाटील, सुखदेव होलार, पी. वाय. पाटील, डॉक्टर रवींद्र पाटील, रामकृष्ण पाटील, एड. राज्यक शेख, लोटन पाटील, ज्ञानेश्वर ज्ञानी कोळी, डॉक्टर देवरे, आधार नाना पाटील, दास भाऊ, भगवान संधान शिव, अमित पवार, अशोक पाटील, प्रकाश पाटील, मुरलीधर आप्पा पाटील, शरद दिलीप भाऊसाहेब पाटील आझहर सय्यद, इमरान भाया, इत्यादी कार्यकर्ते हजर होते. सूत्रसंचालन श्री गजेंद्र साळुंखे यांनी केले.