७ दशकानंतर दिल्लीत मराठी साहित्य संमेलन.

0

24 प्राईम न्यूज 5 Aug 2024

यंदाचे ९८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तब्बल ७ दशकांनंतर राष्ट्रीय राजधानी दिल्लीत होणार आहे. आगामी साहित्य संमेलनासाठी ७ ठिकाणांहून निमंत्रणे प्राप्त झाली होती. मात्र साहित्य संमेलन दिल्लीत व्हावे यासाठी गेल्या काही दिवसांपासून जोरदार प्रयत्न सुरू होते. ‘सरहद’ या संस्थेने दिल्ली मराठी प्रतिष्ठान व दिल्लीतील अन्य मराठी संस्थांच्या सहकार्याने साहित्य संमेलन भरविण्याचा प्रस्ताव दिला होता. साहित्य महामंडळाच्या स्थळ निवड समितीने मुंबई, दिल्ली आणि इचलकरंजी या ३ ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन आगामी ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत घेण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!