मनोज जरांगे विधानसभेच्या रिंगणात अपक्ष उतरणार ?

24 प्राईम न्यूज 5 Aug 2024. आगामी विधानसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या उमेदवारांना पाडण्याची तसेच मराठा उमेदवार उभे करण्याची भाषा करणारे मराठा आंदोलनकर्ते मनोज-जरांगे पाटील आता स्वतः निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्यास सज्ज झाले आहेत. कुठल्याही युत्या आघाड्याच्या फंदात न पडता, कुणाच्याही पाठिंब्याची अपेक्षा न करता अपक्ष निवडणूक लढवण्याचा विचार मनोज जरांगे-पाटील यांनी रविवारी प्रसारमाध्यमांशी बोलून दाखवला. तसे झाल्यास मराठा आरक्षणाच्या लढाईला आणखीनच धार चढणार आहे.
आरक्षणाच्या मागणीसाठी विधानसभा निवडणूक लढवणार की विरोध करणाऱ्यांना पाडणार, ही भूमिका २९ ऑगस्ट रोजी जाहीर करणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले होते. पण त्याआधीच जरांगे यांनी अपक्ष लढण्याचे संकेत दिले आहेत.