अमळनेर विधानसभेच्या निवडणुकीत डझनभर उमेदवार. -संभाव्य उमेदवारांमध्ये तीन दादा,दोन डॉक्टर,दोन महिला,एक बिल्डर,व भाई,आणि हाजी साहाब..

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर येत्या तीन महिन्यांत होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छूक उमेदवारांचे धुमधडाका जोरात सुरू आहे अमळनेर विधानसभा मतदारसंघातून डझनभर पेक्षा जास्त उमेदवार रिंगणात उतरतील तीन दादा,दोन डॉक्टर, दोन महिला,सह एक युवा बिल्डर, भाई आणि हाजी साहाब हे प्रमुख उमेदवार असण्याची शक्यता आहे आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी हे एकत्र तर महायुती ही एकत्रितपणे निवडणूका लढवितील २०१९ च्या निवडणूकीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल भाईदास पाटील यांना ९३७५७ मते मिळाली होती म्हणजे ५०.७० टक्के येवळी होती तर भारतीय जनता पक्षाचे शिरीष हिरालाल चौधरी यांना ८५१६३ मते मिळाली होती म्हणजे 46, टक्के येवळी होते राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल भाईदास पाटील हे ८५९४ मतांनी विजयी झाले होते यंदा महायुती कडून अजित पवार गटाचे अनिल भाईदास पाटील यांची उमेदवारी निश्चितच आहे महाविकास आघाडीने एकत्रित निवडणूक लढविली तर तीनही पक्षाचे उमेदवार दावा करीत आहेत ही जागा जर शरद पवार गटाला मिळाली तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ बी एस पाटील महिला उमेदवार पक्षाच्या वरिष्ठ नेत्या तिलोत्तमा पाटील,युवा बिल्डर प्रशांत निकम, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील,उमेश रावसाहेब पाटील,हे प्रमुख दावेदार आहेत काँग्रेस पक्षाला जागा सुटली तर काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते डॉ अनिल शिंदे, संदिप घोरपडे सर, काँग्रेसच्या महिला नेत्या सुलोचना वाघ, हे इच्छुक उमेदवार आहेत, उध्दव ठाकरे शिवसेना गटा तर्फे अँड ललित ताई पाटील, हे ही इच्छुक उमेदवार आहेत तसेच माजी आमदार शिरीष चौधरी यांनी नुकतेच पत्रकार परिषद घेऊन अपक्ष उमेदवारी करणार असे जाहीर करून दिले आणि कामाला ही लागून गेले दुसरे अपक्ष उमेदवार तालुक्यातील झाडी येथील रहिवासी व गुजरात पोलिस विभागाचे निवृत्त प्रकाश भाई पाटील यांनी ही विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आपल्या प्रचाराची रणधुमाळी सुरू केली आहे मुस्लिम समाजाचे वरिष्ठ सामाजिक कार्यकर्ते हाजी नसिरुद्दीन शरफोद्दीन शेख हे कदाचित एम आय एम च्या वतीने व वंचित बहुजन आघाडी कडून किवा अपक्ष उमेदवारी करण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे तालुक्यातील जनतेत अशी ही चर्चा आहे की जरी माजी आमदार साहेबराव पाटील यांनी मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या सोबत हातमिळवणी केली परंतु ऐनवेळी ते तुतारी घेऊन उमेदवारी करतील दुसरे अपक्ष उमेदवार प्रकाश भाई पाटील हे पण तुतारी साठी इच्छुक असु शकतात.