बाम्हणे येथे कृषी कार्यानुभव कार्यक्रम संपन्न…

दोंडाईचा प्रतिनिधी रईस शेख
कृषी महाविद्यालय दोंडाईचा अंतर्गत बामणे येथे चालू असलेल्या ग्रामीण जागरूकता आणि कृषी उद्योग कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषी विद्यार्थीनी गावात शून्य उर्जेवर आधारित शीत कक्ष उभारून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले शून्य उर्जेवरील शीत कक्षा चे फायदे आणि महत्व शीत कक्ष तयार कसा करावा याविषयी कृषिदूत स्वप्निल गोसावी यांच्याकडून आधुनिक शेती संदर्भात मार्गदर्शन करताना आले. यावेळी ऋषिकेश पाटील,प्रसाद पगार, चेतन पाटील, रोहन महाले ,दुर्गेश पाटील, हर्षल कोळी, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य आर.बी. राजपूत, कार्यक्रम समनव्यक प्रा. गोपाल एस. बोरसे कार्यक्रम अधिकारी प्रा. रोहित एन.मराठे, प्रा. एम आर पान्हेरकर, संबंधित विषयातील विषय विशेष तज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्यक्रम पार पाडण्यात आला. सर्व उपस्थित ग्रामस्थ यांचे कृषी महाविद्यालयाच्या वतीने आभार व्यक्त केला.