विनापरवानगी झाड तोडल्यास ५० हजार रुपयांचा दंड.

24 प्राईम न्यूज 8 Aug 2024
विनापरवानगी झाड तोडल्यास आता ५० हजार रुपयांचा दंड वसूल करण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. सध्या १ हजार रुपये दंड आकारण्याची तरतूद आहे. दंडाशिवाय अशा रीतीने तोडलेले कोणतेही झाड आणि ते वाहून नेण्यासाठी वापरलेली हत्यारे, नौका, वाहने सरकारजमा करण्यात येतील. यासंदर्भातील दुरुस्ती महाराष्ट्र वृक्षतोड (नियमन) अधिनियम १९६४ मधील कलम ४ मध्ये करण्यात येऊन अध्यादेश काढण्यात येणार आहे.