रावेर शहरात महावितरणचे दुर्लक्ष नागरिकांच्या जीवाशी खेळ

रावेर/शरीफ शेख
रावेर शहरात काही दिवसापासून पाऊस सुरू असल्यामुळेही अनेक ठिकाणी उघडे डी पी पडले आहेत. दरवाजे नसल्याने विद्युत तारांचे जाळे उघड्यावर आहे या उघड्या तारांना एखादा व्यक्तीच्या अनुधानाने स्पर्श झाल्यास मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही .रोहित्रांना दरवाजा लावणे देखभाल दुरुस्तीचे जबाबदारी वीज कंपनीवर आहे मात्र याविषयी कुठल्याही गंभीर चे दिसत नसून रोहित्रांची स्थिती शहरात अनेक ठिकाणी दिसत आहे.
रावेर शहरातील मुख्य रस्त्यावरून शाळेत ये-जा करणाऱ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी शाळेत आपल्या शिक्षण पुर्ण करण्यासाठी येतात तेव्हा त्यांना जीवाला धोकाही निर्माण झाला आहे.
याबाबत वीज वितरण कंपनीकडून दुर्लक्ष केले जात असून एखादी अनुचित घटना घडल्यास यास जबाबदार कोण ?
रावेर शहरातील बहुतांशाने रोहित्र रस्त्याच्या बाजूलाच आहेत अनेक रोहित्रांना संरक्षण जाळी लावण्यात यावी परंतु याकडे सर्रासपणे दुर्लक्ष केले जात असल्याचे एकंदरीत चित्र वरून दिसून येत आहे .
रस्त्यावरील उघड्या डीपी तसेच सर्रासपणे तरीही याकडे संबंधित विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत त्यामुळे कोणाचा तरी जीव गेल्या वरच संबंधित विभागाला जाग येईल का असा प्रश्न रहिवासीयांकडून उपस्थित केला जात आहे.
बऱ्याच दिवसापासून उघडे डी पी दिसत आहे एखादा लहान बालकाचा हात सहजरीचा या डीपी पर्यंत पोहोचू शकतो महावितरणचे अधिकारी व कर्मचारी दुर्लक्ष करीत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.