” डंक छोटा धोका मोठा” “कोरडा दिवस पाळा डेंग्यू टाळा” -अमळनेर शहरात दैनंदिन सर्वेक्षण करून आरोग्य बाबत जनजागृती…

आबिद शेख/अमळनेर. म.जिल्हा आरोग्य अधिकारी,म.जिल्हा हिवताप अधिकारी,तालुका आरोग्य अधिकारी,नगरपालिका मुख्य वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाने सतत पडणाऱ्या पावसाने साथीचे रोग व कीटकजन्य आजार होऊ नये यासाठी आरोग्य विभागामार्फत अमळनेर शहरात गृहभेटी देऊन पाणीसाठा असलेली भांडी पाण्याची तपासणी करून डास अडी आढळलेली भांडी/कंटेनर खाली करण्यात आले. डबक्याच्या ठिकाणी अबेट टाकण्यात आले. शहरवासी यामध्ये जनजागृती करून कोरडा दिवस पाडण्याबाबत आव्हान करण्यात आले. ” डंक छोटा धोका मोठा “”कोरडा दिवस पाळा डेंग्यू टाळा” या म्हणीनुसार उपक्रम राबवण्यात आले माहितीपत्रिकेद्वारे जनजागृती करण्यात आली साचलेल्या पाण्याच्या डबक्यात क्रूड ऑइल सोडण्यात आले. न वाहनाऱ्या पाण्यात गप्पी मासे सोडण्यात आली. कीटकजन्य /साथीच्या आजारा चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील नागरिकांना आरोग्य शिक्षण देण्यात आले. तसेच अंमळनेर शहरात दूर फवारणी करण्यात आली. आरोग्य पर्यवेक्षक यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सर्व टीम तयार करून अंमळनेर शहरात सर्वेक्षण करून तापाच्या रुग्णांचे रक्तजल नमुने घेण्यात येऊन तपासणीसाठी पाठवण्यात आले.