घरोघरी तिरंगा (हर घर तिरंगा) अभियानाचा शुभारंभ.

आबिद शेख/अमळनेर. १५ऑगस्ट २०२४स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगाने दिनांक ९ ऑगस्ट ते २५ ऑगस्ट २०२४ यादरम्यान घरोघरी तिरंगा हे अभियान साजरे करण्यात येणार
आहे. त्यानुसार काल अमळनेर नगर परिषदेतर्फे तिरंगा चौकात व्यापक
प्रसिद्धीसाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याठिकाणी अमळनेर नगर परिषदेतील अधिकारी
कर्मचारी तसेच नागरिकांत तिरंगा शपथ घेण्यात आली. तद्वंतर तिरंगा चौक, दगडी दरवाजा, पाच कंदील, सुभाष चौक ते नगरपरिषद अमळनेर अशी तिरंगा मोटरसायकल रॅली काढण्यात आली.
तसेच शहरातील विविध संघटना वशाळांचे मुख्याध्यापक यांची बैठक आयोजित करून हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत तिरंगा मॅरेथॉन, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रतिज्ञा, मेळा, रॅली आयोजित करण्यास सुचविण्यात आले. याप्रसंगी संदीप घोरपडे, रोटरी अध्यक्ष, अमळनेर मेडिकल असोसिएशन अध्यक्ष व इतर मान्यवर उपस्थित होते. तसेच मोहिमे अंतर्गत ९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान आपल्या घरावर झेंडा फडकून त्यासोबत सेल्फी काढूनwww.harghartiranga. com वेबसाईटवर तिरंगा सेल्फी अपलोड करण्याविषयी नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक तुषार नेरकर यांच्याकडून आवाहन करण्यात आले आहे.