9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस पिंपळे आश्रम शाळेत उत्साहात साजरा.

आबिद शेख/अमळनेर
दिनांक 9 ऑगस्ट 2024 वार शुक्रवार रोजी श्री. चिंतामणी महिला एज्युकेशन सोसायटी संचलित सु.अ. पाटील प्राथमिक आदिवासी आश्रमशाळा व यशवंत माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रम शाळा, पिंपळे बु तालुका अमळनेर जिल्हा जळगाव येथे जागतिक आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आदिवासी दिनाचे औचित्य साधून विविध सांस्कृतिक कार्यक्रम , वकृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या .सांस्कृतिक कार्यक्रमातून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले.विद्यार्थिनींनी अदिवासी पोशाख घालून आदिवासी नृत्य सादर केले. विद्यार्थ्यांनी आदिवासी संस्कृती व समाजाविषयी मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमास अध्यक्ष प्राथमिक विभागाचे मुख्या. श्री. अविनाश अहिरे होते.तसेच कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आदरणीय श्री.दिलीपराव साहेबराव पाटील माजी पोलीस पाटील पिंपळे बु.होते.तसेच माध्यमिक मुख्या. श्री उदय पाटील , शिक्षकवृंद व पालक वर्ग देखील उपस्थित होता.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री डी. डी .नांद्रे सर यांनी केले.