युवक काँग्रेस ६४ स्थापना दिनानिम्मित वृक्षरोपण करण्यात आले.

दोंडाईचा प्रतिनिधी रईस शेख
भारतीय युवक काँग्रेसच्या स्थापनादिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे कार्यकारी अध्यक्ष,आमदार मा.कुणाल बाबा पाटील साहेब व धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष मा.शाम भाऊ सनेर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रभारी मा.एहसन अहमद जी व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष मा.कुणाल दादा राऊत यांचे आदेशानुसार अखिल भारतीय युवक काँग्रेसच्या 64 व्या स्थापना दिनानिमित्त दोंडाईचा शहर युवक काँग्रेसच्या वतीने वृक्षारोपणचा कार्यक्रम राबवण्यात आला.
त्यावेळी दोंडाईचा शहर युवक काँग्रेसचे,शेख मोनूबाबा (मोईन), इरफान सय्यद, इंजिनीयर उमेश पाटील, युनूस पिंजारी, अयाज मिर्झा, रईस शेख, कादिर कुरेशी, दाऊद शेख, फिरोज भाई, बाबुभाई, व अनेक कार्यकर्ता उपस्थित होते..