साथी गुलाबराव पाटील सामाजिक पुरस्कार प्राचार्य मधुकर भोजू शिरसाठ याना तर. -व राजकीय पुरस्कार (पुरोगामी) खुरसापूर चे सरपंच सुधीर गोतमारे याना प्रदान.

आबिद शेख/अमळनेर
माजी आमदार साथी गुलाबराव पाटील स्मृती समारोह निमित्ताने अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाच्या तर्फे वतीने आयोजित राज्यस्तरीय साथी गुलाबराव पाटील सामाजिक पुरस्कार प्राचार्य मधुकर भोजू शिरसाठ याना ज्येष्ठ समाजवादी तर
साथी गुलाबराव पाटील राजकीय पुरोगामी पुरस्कार प्रा सुधीर गोतमारे याना ज्येष्ठ समाजवादी दामोदर वाढवे आणि संस्थेचे अध्यक्ष हेमकांत पाटील,सचिव संदीप घोरपडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी पुरस्कारार्थी मधुकर शिरसाठ यांनी आपल्या मनोगतातून साथी गुलाबराव पाटील यांचा अमळनेर च्या विकासात सिंहाचा वाटा असल्याचे सांगत, हरिजन सेवक संघाचा जनरल सेक्रेटरी म्हणून केलेली काम आणि त्यातून उभे राहिलेले
राजेंद्र छात्रालय, काकासाहेब बर्वे मुलींचे छात्रालय या मागची यशोगाथा सांगितली
तर राजकीय पुरस्कार प्राप्त खुरसापूर चे सरपंच सुधीर भोतमरे यांनी लोकांना फुकटच्या योजना देऊ नये, ते लोकांना पंगू बनवते, लोकांना स्वावलंबी बनविले पाहिजे, आज आमच्या गावात फक्त 20 महिलांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरल्याचे सांगितले,आपल्या सरपंच पदाच्या कार्यकाळात 800 फुटांवर गेलेली पाणी पातळी 200 फुटावर आणली पाणी शिक्षण आरोग्य यावर काम केल्यानेच आज गावाच्या विकासासाठी 47 कोटी निधी आणल्याचे सांगितले केलेला विकास कामे शाश्वत स्वरूपाची केल्याने अमेरिका इंग्लंड, युनिसेफ ची पथक आज गावाची पाहणी करायला येतात असे सांगत कामात पारदर्शकता ठेवली,लोक सहभाग वाढवला त्यामुळे च गाव आदर्श करू शकले असे यावेळी सांगितले
केलेल्या विकास कामे इतरांना कशि आदर्श ठरू शकतात याची माहिती दिली
यावेळी प्रसिद्ध कवी जगदीश देवपूरक यांनी देखील आपल्या कवितेच्या माध्यमातून बापूंच्या स्मृतींना उजाळा दिला
ज्येष्ठ समाजवादी दामोदर वाढवे यांनी इंदिरा गांधी लावलेल्या आणीबाणी मुळे तुरुंगात असताना बापूंची भेट नाशिक येथे घडली
बापूंमुळे ती जेल नव्हती तर ते कार्यकर्त्यांचे प्रबोधन केंद्र झाले होते
बापूंमुळे च आज पोलिसांची हाफ पॅन्ट गेली व त्यांना फुल पॅन्ट मिळाल्याचा अनुभव वाढवे यांनी या वेळी सांगितला
वाढवे यांनी स्वर्गीय बापूंच्या अनेक आठवणींचा उजाळा दिला
तर रमेश दाणे यांनी भाषणाचा इंटरव्हल करणारा, 288 मधील एकमेव आमदार म्हणजे गुलाबराव पाटिल होय, असा गौरव त्यांनी भाषणातून बापूंचा केला कार्यक्रमाच्या सुरुवातीला राज्य स्तरीय वक्तृत्व स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे मानकरी यश रवींद्र पाटील, द्वितीय आलेली कोमल नरेंद्र शेलार, तृतीय क्रमांकांचा वरूण प्रकाश घरटे यांना पारितोषिक वितरण करण्यात आले तसेच वक्तृत्व स्पर्धा गाजवणाऱ्या या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आपले भाषण यावेळी सादर केले सूत्रसंचालन अनिता बोरसे आणि जे एस पाटील यांनी केले तर आभार संचालक ऍड अशोक बाविस्कर यांनी मानलेया वेळी व्यासपीठावर रमेश दाणे धुळे, दामोदर वाढवे चंद्रपूर, हेमकांत पाटील,संदीप घोरपडे, गुणवंतराव पाटील,ऍड अशोक बाविस्कर, किरण पाटील, भास्कर बोरसे,प्राचार्य शेख,मगन पाटील उपस्थित होते संदीप घोरपडे यांनी प्रास्ताविकातून कैलासवासी माजी आमदार साथी गुलाबराव पाटील यांचा जीवनपट उलघडला,तसेच सामाजिक व राजकीय पुरस्कार देण्यामागचा उद्देश सांगितला. सूत्रसंचालन अनिता बोरसे आणि जे एस पाटील यांनी केले.
.