पांझरा नदी पात्रात वाळू माफियांचा सुळसुळाट. -महसूल यंत्रणा सुस्त.

रेल्वे पुलाला उद्भवतोय धोका-
आबिद शेख/अमळनेर पांझरा नदीवर असलेल्या सुरत- भुसावळ रेल्वे लाईन जवळील दोन्ही पुलाखालून देखील मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा केला जात असून यामुळे मात्र रेल्वे मार्गाला देखील भविष्यात धोका उद्भवू शकतो. याकडे रेल्वे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. ग्रामस्थांनी याआधी रेल्वे लाईन पुलाजवळ चारी खोदून वाळू चोरी रोखण्याचे प्रमाण थांबवले होते. मात्र वाळू चोरट्यांनी ती चारी बुजून पुन्हा एकदा वाहतूक सुरू केली आहे. म्हणून रेल्वे प्रशासनाने सुद्धा या ठिकाणी कायमस्वरूपी लोखंडी पोल गाडून येथील वाळू तस्करीचा कायम स्वरुपी बंदोबस्त करावा अशी मागणी पंचक्रोशीत ग्रामस्थ मंडळाकडून करण्यात येत आहेत कारण वाळू तस्कर गावातून, गल्लीतून ट्रॅक्टर, ढंपर मोठ्या वेगाने चालवत असतात त्या मुळे भविष्यात मोठा अपघात होऊ शकतो म्हणून प्रशासनाने यावर कायस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.