जुनी पेन्शन योजना मंजूर करण्यासह आपल्या विविध मागण्यासाठी जिल्हा परिषदेचे कर्मचारी दि.२९ ऑगस्ट पासून बेमुदत संपावर.

0

आबिद शेख/अमळनेर. जुनी पेन्शन योजना मंजूर करण्यासह आपल्या विविध मागण्यासाठी जिल्हा परिषदेचे कर्मचारी दि.२९ ऑगस्ट पासून बेमुदत संपावर जाणार आहेत.या बाबतचे निवेदन मंगळवार दि.२७ रोजी जिल्हा परिषद कर्मचारी महासंघातर्फे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अंकित याना देण्यात आले.या वेळी जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
राज्य शासनाच्या कर्मचारी व अधिकारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी गेल्या काही दिवसापासून कर्मचारी संघटना मार्फत लावून धरण्यात आली आहे. जिल्हा परिषद कर्मचारी शिक्षक समन्वय समितीने दिनांक १४ डिसेंबर २०२३ पासुन बेमुदत पंप पुकारला होता. त्या पार्श्वभूमीवर दिनांक १३ डिसेंबर २०२३ रोजी मुख्यमंत्री तथा दोन्ही उपमुख्यमंत्री , व मुख्य सचिव तसेच सामान्य प्रशासन व वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांच्या समवेत झालेल्या चर्चेनुसार विधीमंडळात राज्यातील सर्व अधिकारी कर्मचान्यांना जुन्या पेन्शन योजने प्रमाणेच आर्थिक व सामाजिक लाभाची सुधारीत राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करणे संबंधी येत्या अर्थ संकल्पीय अधिवेशनासमयी अधिसुचना ,शासन निर्णय निर्गमित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु ८ महिन्याचा दिर्घ कालावधी लोटूनही अद्यापही कार्यवाही प्रलंबीत आहे. आज मितीस ६ महिन्याचा कालावधी होऊनही कर्मचाऱ्यांची संख्या, आर्थीक भार अशा अनावश्यक व निरर्थक त्रुट्या दर्शवून शासन निर्णय निर्गमित करण्यास कालहरण करीत आहेत. हि बाब संपुर्ण राज्यात विवीध विभागातील ग्रामविकास गतिमान करणाऱ्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यावर अन्याय करणारी आहे. या अन्यायाविरुध्द प्रचंड असंतोष व नाराजी असुन न्याय निर्णयाली करिता शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषद कर्मचारी यांनी ९ ऑगस्ट रोजी काळ्या फिती लावून आंदोलन केले होते.तरी देखील जुन्या पेन्शन योजने बाबत सरकारने कोणताही सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने कर्मचारी संघटना २९ ऑगस्ट गुरुवार पासून संपावर जात आहेत. अशा आशयाचे निवेदन मंगळवारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले .या वेळी कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष डी.एस.पाटील,सचिव सलीम पटेल,सुनील सूर्यवंशी,अजबराव पाटील,भूषण तायडे,भरत चौधरी,अनिल भदाने,नदीम मिर्झा,विलास बोंडे,राजू सोनवणे,दत्तू सोनार,यांचे सह इतर पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!