क्लस्टर अधिवेशनातुन संविधान अंमलबजावणीचा केला निर्धार.

नंदुरबार /प्रतिनिधी
नंदुरबार-संविधानाच्या अंमलबजावणीच्या लोकाग्रहानेच आपले हक्क सुरक्षित राहतील असे मत बामसेफचे राष्ट्रीय संघटन सचिव संजय मोहिते यांनी व्यक्त केले ते भारतीय संविधान सम्मान सुरक्षा आणि संवर्धन महाजनजागरण अभियान अंतर्गत बामसेफ व सहयोगी संघटनेद्वारे रविवारर दिनांक २५ ऑगस्ट रोजी छत्रती शिवाजी महाराज नाट्यगृह नंदुरबार येथे आयोजित कलस्टर अधिवेशनात उद्घाटन व प्रबोधन सत्रात संविधान अंमलबजावणीचा लोकाग्रह हा सत्ताधाऱ्यांच्या वर्तनाची दिशा व कार्यप्रणलीचा आस ठरेल या विषयावर अध्यक्षीय भाषणात बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, संविधानाच्या प्रचाराला आंदोलनाचे स्वरूप देऊन आपला अजेंडा जनते समोर मांडला पाहिजे, त्यात देशातील सर्व खाजगी संस्थांचे राष्ट्रीयकरण, युनिफॉर्म आणि फ्री एज्युकेशन पॉलिसी, आरोग्य सेवेचे राष्ट्रीयकरण, युवकांना सन्मानाचा रोजगार, मजुरांचे शोषण करणारे कायदे रद्द करणे, जाती निहाय जनगणना करणे, क्रिमीलेअर समाप्त करणे, आरक्षण सिलिंग रद्द करणे, देशाला विघटनाकडे नेणाऱ्या विषमता वाद्यांचा सफाया करणारे कायदे बनवणे हे सर्व लोकांच्या आग्रहानेच शक्य आहे, असे मत व्यक्त केले, अधिवेशनाचे उद्घाटन बामसेफचे वरिष्ठ राष्ट्रीय प्रचारक रावजीभाई पटेल यांनी केले. विशेष अतिथी म्हणून मा. हनिफभाई हंसलोद, मा. प्रणाली मराठे व रविंद्र मोरे हे होते या सत्राचे प्रास्ताविक प्रविण खरे यांनी, सुत्र संचालन ललिता शिरसाठ यांनी तर आभार गोकुळदास बेडसे यांनी मानले.
सामाजिक अभिसरणाद्वारेच राष्ट्र उभारणी शक्य आहे या प्रतिनिधींच्या विषयावर चुनीलाल ब्राह्मणे, मौलाना ज़केरीया रहमानी, मुकेश कापुरे, हेमकांत मोरे, वनिता पटले, पंकज भदाणे, सुभाष सावंत, कुंदन थनवार, विजय शिरसाठ, एजाज बागवान, दयाशंकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले विषयाची अध्यक्षता मा. रविंद्र मोरे यांनी केली. या सत्राचे प्रास्ताविक पावबा ठाकरे यांनी संचालन परमेश्वर मोरे यांनी तर आभार मिजानुर शेख यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गोरखनाथ बिरारे, गौतम भामरे, बि एस पवार, रविंद्र सुर्यवंशी, धुडकू पवार, संतोष नागमल, भारत बैसाणे, मनिषा ठाकरे, अस्मिता मोहिते, पराग जगदेव, दिलीप खैरनार, रमेश बिरारे, संघमित्रा बेडसे, योगेश हिरे, संजय जाधव आदी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.