ऑक्टोबर मध्ये 15 दिवस बँका बंद.

0

24 प्राईम न्यूज 28 Sep 2024.

मुंबई : सप्टेंबर महिना संपायला आता दोन-तीन दिवस उरले आहेत. ऑक्टोबर महिन्याचा आता सुरू होईल. यावर्षी ऑक्टोबर महिन्यात सुट्यांचा हंगाम आहे. या महिन्यात गांधी जयंती, नवरात्री, दसरा आणि दिवाळी सारख्या मोठ्या सणांची रेलचेल आहे. या काळात घराघरात साफसफाई, रंग-रंगोटी, स्वच्छतेची कामं हाती घेण्यात येतात. या सणासुदीत ऑक्टोबर महिन्यात सुट्यांचा पडाव राहणार आहे. अनेक दिवस बँकांना टाळे असेल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकांसाठी सुट्यांची यादी जाहीर केली आहे. त्यामुळे तुमची बँकेतील काही महत्वाची कामं असतील तर ती झटपट उरकून घ्या. RBI प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीलाच बँकेसंबंधीच्या सुट्यांची यादी जाहीर करते. या यादीनुसार, ऑक्टोबर महिन्यात 31 दिवसातील जवळपास 15 दिवस सुट्टी असेल. यामध्ये शनिवार आणि रविवारच्या सुट्यांचा समावेश आहे. 2 ऑक्टोबर गांधी जयंती, 3 ऑक्टोबर नवरात्री, 6 ऑक्टोबर रविवार, 10 ऑक्टोबर दुर्गा पूजा, दसरा, 11 ऑक्टोबर दसरा, 12 ऑक्टोबर दसरा, विजयादशमी, 13 ऑक्टोबर रविवार, 14 ऑक्टोबर दुर्गा पूजा, 16 ऑक्टोबर लक्ष्मी पूजा, 17 ऑक्टोबर महर्षि वाल्मीकि जयंती, 20 ऑक्टोबर रविवार, 26 ऑक्टोबर चौथा चौथ्या शनिवार, 27 ऑक्टोबर रविवार आणि 31 ऑक्टोबर रोजी दिवाळीमुळे देशभरातील बँकांना सुट्टी असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!