नगरपालिके तर्फे धडक कारवाई थकबाकी पोटी सहा पतपेड्या, सहा दुकाने सिल…

अमळनेर (प्रतिनिधि) नगरपालिके तर्फे धडक कारवाई थकबाकी पोटी सहा पतपेढया ,सहा दुकाने सील करून १३ नळ जोडण्या बंद करण्यात आले आहेत.
मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्या आदेशाने उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड , कर निरीक्षक जगदीश परमार , शेखर देशमुख , गणेश शिंगारे यांच्या पथकाने सकाळी कारवाईची धडक मोहीम सुरू केली. धुळे रोड वरील सहा दुकाने सील केली. काही दुकानदारांनी कारवाई सुरू होताच ९७ हजार ५०० रुपये थकबाकी भरली. तर न्यू प्लॉट भागात १३ नागरिकांकडे पाणी पट्टी कर बाकी असल्याने त्यांच्या नळजोडणी बंद करण्यात आले.
त्याचप्रमाणे आशापुरी नागरी पतपेढी कडे १ लाख ६३ हजार ३४ रुपये थकबाकी , पूर्णवाद नागरी सहकारी पतपेढी कडे ९७ हजार ५७४ , मंगलमूर्ती नागरी पतपेढी ९ लाख ९८ हजार ३४३ रुपये , श्रीराज नागरी पतपेढी ४ लाख ६५ हजार ४५०, मैत्रेय प्लॉटस अँड डेव्हलपर्स यांच्या दोन मालमत्ताकडे ५ लाख ५२ हजार ४७२ रुपये अशी एकूण २२लाख ७६ हजार ८७३ रुपये थकबाकी असल्याने त्यांना देखील सील लावण्यात आले आहे.