एमआयडीसी पोलिसांची व मस्जिद विश्वस्तांची स्नेह सभा…

0

जळगाव (प्रतिनिधि) एम आय डी सी पो स्टेशन ला हजर झालेले पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी मेहरुण परिसरातील १० मशिदीचे विश्वस्तांची एक स्नेह भेट अंतर्गत सभा बोलवून सर्व विश्वस्तां सोबत ओळख परीचय करून शासनाच्या व खास करून पोलिसांच्या मस्जिद ट्रस्ट कडून काय अपेक्षा आहे या बद्दल मार्गदर्शन केले. ट्रस्ट च्या सुद्धा अडी अडचणी समजुन घेतल्या व एकमेकांच्या सामज्यसाने अडचणी दूर करूया तसेच दोन समाजात सलोखा निर्माण करु या असे ठरले.

मस्जिद दर्शन पंधरा वाडा

अकसा मस्जिद व ईद गाह ट्रस्ट चे सचिव फारूक शेख यांनी पोलीस व ट्रस्ट च्या सयुक्त विद्यमाने मस्जिद दर्शन हा पंधरवाडा साजरा करून आमच्या हिंदू बांधवांना मस्जिद दाखवून त्यात काय काय असते? तिथे ५ वेळा नमाज कशी होते? अजान मध्ये काय असते? तसेच त्यांच्या शंका चे निरासन करण्यात येईल. या वर सर्वाचे एकमत झाले.

मराठी पुस्तकांचे संच भेट
वाहिदत ए इस्लामी चे अतिक शेख यांनी मराठीतील इस्लाम धर्मा ची विविध पुस्तकांचा संच फारूक शेख, मुफ्ती अबुजर,मुफ्ती नुरुल हक, हाफिज जाहीद, सलीम इनामदार, युसूफ शेख यांच्या हस्ते पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना भेट म्हणून देण्यात आले.

सभेत यांची होती उपस्थिती
अकसा मस्जिद चे फारूक शेख,रजा मस्जिद चे मुफ्ती नजमुलहक, इकबाल वजीर,मस्जिद अलमानान चे मुफ्ती अबुजर,जामा मस्जिद मेहरुण चे हाफिज जाहीद,मस्जिद अल बरकती चे हाफिज अर्षद अली, रशीद शेख, मस्जिद ए फातेमा हाफिज मुश्ताक, मस्जिद ए उमर सलीम इनामदार, युसूफ शेख, रफिक शेख,मस्जिद ए संजेरी हाजी रमजान,मस्जिद ए अकसा हनिफ खान, सईद पटेल,निहाल शेख, आदींची उपस्थिती होती.

या सभेचे सूत्र संचलन सहा पोलिस उप निरीक्षक विश्वास बोरसे विश्वास तर आभार पोलिस हेड कॉन्स्टेबल प्रदीप पाटील यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!