सामूहिक विवाह सोहळयात एक डझन जोडपी झाली सोबती. -हसनैन करीमैन वेल्फेअर संवस्थेने केले आयोजन.

0

आबिद शेख/अमळनेर

कवी साबीर मुसतफाआबादी यांचे स्वागत सैय्यद अझहर अली यानि केले

अमळनेर शहरातील सेवाभावी सामाजिक संस्था हसनैन करीमैन वेल्फेअर सस्थांच्या माध्यमातून दर वर्षी इस्लामी महिन गयारवी शरीफचे औचित्य साधून ऑल मुस्लिम समाजाचे सामुहिक विवाह समारंभाचे आयोजन करण्यात येते.यंदा दिनांक ५ ऑक्टोबर २०२४शनिवारी मध्यप्रदेशातील भिकनगांव येथील मौलाना मुफ्ती इमरान नक्शबंदी यांच्या मुख्य उपस्थितीत ११ जोडप्यांचा विवाह सोहळा अतिशय उत्साहात संपन्न झाला मुस्लिम समाजातील प्रत्येक व्यक्तीने असेच सुन्नत प्रमाणे कमीत कमी खर्चात विवाह करावे जास्तीत जास्त लोकांनी आपल्या मुलींचे लगन सामुदायिक विवाहात करावे जेणेकरून आपल्या खर्चा ची बचत होईल मौलाना मुफ्ती इमरान नक्शबंदी यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितल
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मौलाना कारी मोतेशीम हजरत यांनी कुराणातील तिलावत वाचन केली तर शहरातील विविध मस्जिदेतिल मौलाना यांनी निकहा लावला कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून जळगांव येथील इकरा संस्था चे सचिव एजाज मलिक,मनियार समाजाचे अध्यक्ष फारुख शेख, दोंडाईचा नगरपालिकाचे उपाध्यक्ष नबु सेठ पिंजारी, कुरैशी जमातचे जळगांव जिल्हाध्यक्ष जाकिर कुरैशी, भडगांव अँग्लो ऊर्दू शाळेचे चेअरमन हाजी मुनसफ खान, मोहसीन मुनाफ खाटीक, जळगांवचे माजी उपमहापौर करीम सालार सर,सह आदि मान्यवर उपस्थित होते सर्व उपस्थितींचे संस्था तर्फे सत्कार करण्यात आला तसेच सामाजिक कार्यकर्ते रफीक मिस्तरी आणि सैय्यद मुशर्रफ अली यांच्या वतीने सर्व संचालक मंडळाचे सत्कार करण्यात आले कार्यक्रमाला यशस्वीतेसाठी हसनैन करीमैन वेल्फेअर संस्थाचे अध्यक्ष हाजी शब्बीरअली सैय्यद, उपाध्यक्ष मोईनुद्दीन शेख ( मोना दादा ) उपाध्यक्ष जाकिर शेख शकुर, सचिव सैय्यद अजहर अली, खाजिनदार आरिफ मेमन, सहसचिव अशफाक शेख, सदस्य सैय्यद नबी, जुबेर खान पठाण,मुत्तलीब खाटीक, ( मट्यासेठ) इमरान शेख, यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमात सुत्र संचालन जळगांव येथील सुप्रसिध्द ऊर्दू कवी साबिर मुस्तफा आबादी यांनी केले तर आभार प्रदर्शन रिजवान मनियार, यांनी हसनैन करीमैन वेल्फेअर संस्थाचे हे पांचवे सामुहिक विवाह होते सन २०१८ ते २०२४ पर्यन्त एकुण ४४ जोडप्यांच्या लग्न करण्यात आले आहे संस्थेच्या वतीने सर्व संचालक मंडळाने मिळून एक लाख अठरा हजार रुपये व शहरातील ठराविक मुस्लिम बांधवांनी व समाजाच्या काही दानशूर व्यक्तींनी देणगी म्हणून मदत केली आणि अतिशय उत्कृष्टपणे अकरा जोडप्यांच्या सामुहिक विवाह पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!