अमळनेर एम आय एम च्या शहर अध्यक्ष पदी हाजी सईद यांची फेर निवड.

अमळनेर
आबिद शेख/अमळनेर. अमळनेर शहरातील कसाली मोहल्ला येथील रहिवासी व सामाजिक क्षेत्रात कायम अग्रस्थानी राहणारे हाजी सईद शेख यांची एम आय एम पक्षाच्या तालुका व शहर अध्यक्ष पदासाठी फेर निवड करण्यात आली एम आय एम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन आवेसी महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील, महाराष्ट्र वर्कीग कमिटीचे अध्यक्ष गफ्फार कादरी, यांच्या आदेशानुसार जळगांव जिल्ह्याचे अध्यक्ष अहेमद शेख सर यांनी नुकतेच हाजी सईद शेख अय्युब यांचे कार्य पाहून व त्यांनी एम आय एम पक्षासाठी केलेल्या कामाचा आढावा घेऊन अमळनेर तालुका व शहर अध्यक्ष पदासाठी फेर निवड करण्यात आली निवडीचे लेखी पत्र जळगांव येथे देण्यात आले यावेळी ,गुलाम पिंजारी, शाहिद शेख,नईम पठान, शाहरुख खान ,उपस्थित होते अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पक्षाचे सर्व पदाधिकारी व मित्र परिवारा तर्फे अभिनंदन करण्यात आले..