झिशान सिद्दिकीही होते टार्गेटवर.

24 प्राईम न्यूज 15 Oct 2024
गेल्या शनिवारी दसऱ्याच्या दिवशी वांद्रे येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांची तिघांनी गोळ्या झाडून हत्या केली. यावेळी आरोपींच्या टार्गेटवर बाबा सिद्दिकी यांच्यासह त्यांचे चिरंजीव झिशान सिद्दिकीदेखील होते, अशी कबुली अटक आरोपींनी चौकशीत दिल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. आरोपींना पितापुत्राला मारण्याची सुपारी देण्यात आली होती. दोघांना एकत्र मारण्याची संधी मिळाली नाही तर जो समोर येईल त्याला मारण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार मारेकरी झिशान सिद्दिकींच्या कार्यालयाबाहेर दबा धरून बसले होते. बाबा सिद्दिकी कार्यालयाबाहेर येताच गोळीबार करण्यात आला.