सामाजिक व आरोग्य क्षेत्रातील गोहर आरा (आंटी) यांचे दुःखद निधन.

0

आबिद शेख/ अमळनेर

अमळनेर शहरातील कसाली मोहल्ला येथील रहिवासी मुस्लिम महिला गोहर आरा सलीम शेख ( आंटी ) यांचे दिनांक १२ ऑक्टोबर २०२४ रोजी निधन झाले त्यांचे सामाजिक व आरोग्य क्षेत्रातील थोडक्यात सविस्तर माहिती
महिलांचे काम सामान्यत: “पुरुषांच्या काम” पेक्षा कमी मोबदला किंवा मोबदला नसलेले असते आणि “पुरुषांच्या कामा” सारखे जास्त मूल्यवान नसते. स्त्रियांच्या बहुतेक कामांचा श्रमासंबंधीच्या अधिकृत आकडेवारीमध्ये समावेश केलेला नाही, ज्यामुळे स्त्रिया सामान्यत: अदृश्यपणे करतात. त्याचप्रमाणे, टेपेस्ट्री, रजाई, शिवणकाम आणि विणकाम यासारख्या सर्जनशीलतेच्या अनेक कृती, जे सहसा स्त्रिया करतात, मुख्य प्रवाहातील कलाविश्वाने पारंपारिकपणे कमी केले आहे, स्त्रियांचे कार्य म्हणून वर्गीकृत केले आहे आणि असेच आमच्या गोहर आरा सलीम शेख हे आंटी म्हणून परिसरात परिचित आहे आंटी हे मागील दहा वर्षांपासून आधार संस्थाच्या माध्यमातून सुरू असलेले शहरी आधार विप्रो केअर आरोग्य प्रकल्प मध्ये आशा सेविका म्हणून कार्यरत होते कसाली मोहल्ला आणि भोईवाडा परिसरात रात्र बेरात्री महिलांची प्रसूतीसाठी तथा अन्य कोणत्याही आजार असल्यास आंटी त्यांच्या मदतीला धावून येतात नुकतेच त्यांना रोटरी क्लब अमळनेर तर्फे महिला दिनानिमित्त पुरस्कार देऊन गौरविण्यात आले दिनांक १२ ऑक्टोबर रोजी आंटी ची निधनाची बातमी कळताच परिसरातील नागरिक विशेष करून महिला वर्ग सून झाले होते
त्यांच्या पश्चात पती तीन मुले तीन सून व नात नते असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!