शेतकऱ्यांमध्ये नॅनो युरिया व डीएपी वाटपाबाबत संभ्रम

0

24 प्राईम न्यूज 17 Oct 2024.

कापूस व सोयाबीन उत्पादनात वाढीसाठी कृषी विभागामार्फत अमळनेर तालुक्यात अभियान राबवण्यात येत आहे. त्यात शेतकऱ्यांना नॅनो युरिया व नॅनो डीएपी हे अनुदानावर देण्यात येत आहे. परंतु कमी व अधिक क्षेत्र असलेल्या प्रत्येक शेतकऱ्यांना सारखेच खाद दिले जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाले आहे.

कृषी विभागामार्फत अमळनेर तालुक्यात सुरू असलेल्या या कापूस व सोयाबिन उत्पादकता वाढ या अभियानामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात आधार मिळत आहे. परंतु ४०
आर. क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांसह १०० आर. क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांनाही एक बॉटल नॅनो युरिया व एक बोटल नॅनो डीएपी वाटप करण्यात येत आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. तर कृषी विभागाकडून याबाबत समाधानकारक माहितीही दिली जात नसल्याने शेतकरी संभ्रमात पडले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!