शासकीय कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड !महागाई भत्त्यात ३ टक्क्यांची वाढ.

24 प्राईम न्यूज 17 Oct 2024.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (डीए) आणि निवृत्तिवेतनधारकांचा महागाई दिलासा (डीआर) यामध्ये ३ टक्के वाढीचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे लाखो शासकीय कर्मचाऱ्यांसह निवृत्तिवेतन (पेन्शन) धारकांची दिवाळी गोड होणार आहे. ही वाढ ७ व्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशींवर त्यामुळे लाखो शासकीय कर्मचाऱ्यांसह निवृत्तिवेतन (पेन्शन) धारकांची दिवाळी गोड होणार आहे. ही वाढ ७ व्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशींवर आधारित स्वीकृत सूत्रानुसार आहे. महागाई भत्ता आणि महागाई सवलत या दोन्हींचा एकत्रित परिणाम म्हणून सरकारी तिजोरीवर प्रतिवर्ष ९,४४८.३५ कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडेल.
केंद्र सरकारच्या निर्णयानुसार, भाववाढीची भरपाई करण्यासाठी जाहीर करण्यात आलेली ही सवलत मूळ वेतन/निवृत्तिवेतनाच्या विद्यमान ५० टक्क्यांवरून आता ५३ टक्के होईल. ही वाढ १ जुलै २०२४ पासूनच लागू असणार आहे. म्हणजेच जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या ३ महिन्यांची थकबाकीदेखील केंद्रीय शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. या डीए वाढीचा लाभ सुमारे ४९.१८ लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि ६४.८९ लाख निवृत्तिवेतनधारकांना होणार आहे. शासकीय कर्मचाऱ्यांना डीए आणि पेन्शनधारकांना डीआर (महागाई सवलत) दिले जाते. यामध्ये वर्षांतून जानेवारी आणि जुलैमध्ये अशी दोनदा वाढ केली जाते.