माजी आमदार शिरीष चौधरी २८ रोजी दाखल करणार अपक्ष उमेदवारी अर्ज.

आबिद शेख/अमळनेर. विधान सभा मतदारसंघाचे माजी आमदार शिरीषदादा चौधरी २८ ऑक्टोबर रोजी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार असून मतदारसंघातील जनतेनेमोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिरीष दादा मित्र परिवार चे उपाध्यक्ष श्री गुलाब पाटील, हिरा उद्योग समुहाचे चेअरमन डॉ. रवींद्र चौधरी यांनी तसेच परिवार व कार्यकर्त्यांनी केले आहे केले आहे.

दि.२८ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता संत सखाराम महाराज वाडी संस्थान येथून भव्य रॅलीला सुरुवात होणार आहे. वाडी चौकातून निघालेल्या रॅलीची सांगता प्रांताधिकारी कार्यालय परिसरात होणार असून उपविभागीय अधिकारी कार्यालयात मा. आ. शिरीष चौधरी त्यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.मा. आ. शिरीष चैधरी या निवडणुकीत अपक्ष लढणार असून मतदारसंघातील जनतेने जास्तीतजास्त मोठ्या संख्येने उपस्थित राहून उपकृत करावे, अशी आग्रही विनंती चौधरी परिवार व शिरीष दादा मित्र परिवार कडून करण्यात आली आहे.
