माजी विद्यार्थी कडून दिवाळीचा फराळ वाटप कार्यक्रम संपन्न.

अमळनेर/प्रतिनिधी

दिवाळी फराळ वाटप कार्यक्रम शिरूड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरूड या ठिकाणी शाळेचे माजी विद्यार्थी दानशूर व्यक्तिमत्व श्री धनराज भगवान पाटील पुणे यांच्या सौजन्याने दिवाळी फराळ वाटप कार्यक्रम
संपन्न झाला. सर्व विद्यार्थ्यांना चिवडा व मिठाई शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकाऱ्यांच्या हस्ते वाटप करण्यात आली गेल्या आठ वर्षापासून हा उपक्रम ते सातत्याने राबवत आहेत. धनराज भगवान पाटील यांचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षक वृंद विद्यार्थ्यांना दिवाळीचा फराळ वाटल्याबद्दल
मनापासून आभार व्यक्त करत होते व दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्य तसेच मुख्याध्यापक सर्व शिक्षक वृंद उपस्थित होत.

