डॉ. अनिल शिंदे आज उमेदवारी अर्ज सादर करणार महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे डॉ. शिंदे यांचे आवाहन.

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर – महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ अनिल शिंदे उमेदवारी अर्ज आज दिनांक २९ ऑक्टोबर रोजी सादर करणार आहेत.
सकाळी वाडी संस्थानयेथे संत सखाराम महाराज यांचे आशिर्वाद घेऊन वाजत गाजत महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते रॅली काढून तहसील कार्यालयात उपस्थित राहणार आहेत. तरी काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना महाविकास आघाडीचे सर्व जिल्हा पदाधिकारी, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, सदस्य यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अनिल शिंदे यांनी केले आहे.