डॉ. अनिल शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल: -महाविकास आघाडीचे शक्ती प्रदर्शन…

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ. अनिल शिंदे यांचा उमेदवारी अर्ज ता. 29 रोजी दाखल करण्यात आला. महाविकास आघाडीने यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शनातून आपले प्राबल्य दाखवले.
महाविकास आघाडीचे तसेच काँग्रेसचे उमेदवार डॉ. अनिल नथु शिंदे यांनी आज उपविभागीय अधिकारी नितीन मुंडावरे यांच्याकडे त्यांच्या उमेदवारीचा अर्ज सादर केला.
संत सखाराम महाराज वाडी संस्थानमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी डॉ. अनिल शिंदे यांनी सखाराम महाराजांचे आशीर्वाद घेतले. यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून शक्ती प्रदर्शन केले. याप्रसंगी श्री.जुगल प्रजापती अखिल भारतीय काँग्रेस कमिटी नवी दिल्ली जळगाव जिल्हा निरीक्षक श्री.जुगल प्रजापती,अखिल भारतीय काँग्रेस कमिटी नवी दिल्ली जळगाव जिल्हा पक्ष समन्वयक सुभाष देशमुख जाधव,शरदचंद्र पवार गटाचे डॉ बी एस पाटील,महिला राज्य प्रमुख तिलोत्तमा पाटील, उबाठा गटाच्या ललिता पाटील उपस्थित होते.
डॉ. अनिल शिंदे व कार्यकर्त्यांनी संत सखाराम महाराज वाडी, जैन मंदिर, सराफ बाजार, मांगिरबाबा दर्शन, पाचकंदिल मार्ग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, हुतात्मा चौक, समशेरसिंग पारधी स्मारक, सुभाष बाबू स्मारक, साने गुरुजी स्मारक, स्वामी नारायण मंदिर, गौसे पाक दर्गा, बौद्ध विहार, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, बळीराजा, आणि तहसील कचेरी या ठिकाणी एकत्र येऊन समर्थन दर्शवले.
यावेळी सुलोचना वाघ, प्रा. सुभाष पाटील, सुरेश पाटील, श्याम पाटील, गोकुळ बोरसे, बी. के. सूर्यवंशी, संदीप घोरपडे, सय्यद तेली, विजू मास्तर, पराग पाटील, कुणाल पाटील,कविता पवार, रिता बाविस्कर, राजू शेख, अजहर अली सय्यद, जुबेर पठाण मुन्ना शर्मा, धनगर दला पाटील, संजय पुनाजी पाटील,शांताराम पाटील योजना पाटील, मनोहर निकम दिनेश पवार, समाधान कंखरे, मयूर पाटील, महेश पाटील आदी महाविकास आघाडीचे महिला व पुरुष कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.