बारावीची परीक्षा ११, तर दहावीची २१ फेब्रुवारीपासून…

24 प्राईम न्यूज 22 NOV 2024
महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने गुरुवारी दहावी (एसएससी) आणि बारावीच्या (एचएससी) परीक्षेचे अंतिम वेळापत्रक प्रसिद्ध केले. त्यानुसार दहावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च २०२५ या कालावधीत आणि बारावीची लेखी परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२५ या कालावधीत घेण्यात येईल. दरवर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे ८ ते १० दिवस आधीच परीक्षा होत आहे. राज्य मंडळाचे सचिव देविदास कुल्हाळ यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे अंतिम वेळापत्रकाबाबतची माहिती दिली.