थोड्याच वेळात सुरू होणार मतमोजणी आधी मोजणार टपाली मतदान.

आबिद शेख/ अमळनेर जळगाव जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. ईव्हीएम साठी १४ टेबल, पोस्टल मतदानासाठी ६ आणि इटीपिबीएस साठी ३ टेबल असणार आहेत.प्रत्येक टेबलवर एक अधिकारी एक सहायक व एक शिपाई असणार आहे. एकूण २४ फेऱ्या होणार आहेत. दुपारी १ पर्यंत अंतिम निकाल येण्याची शक्यता आहे.मतदानाच्या वेळी गोंधळ होऊ नये म्हणून १२ अधिकारी आणि ११० पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाआहे. सोशल मीडियावर चुकीचे संदेश व्हायरल करून गोंधळ माजवला जातो, फजिती केली जाते. त्यामुळे मोबाईल ला बंदी घालण्यात आली आहे. तीन ठिकाणी तपासणी करण्यात येणार आहे. प्रवेशद्वाराजवळच पत्रकार कक्ष ठेवण्यात आला आहे.