230 जागा जिंकत महायुती पुन्हा सत्तेत.. -लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली.

0

24 प्राईम न्यूज 24 प्राईम न्यूज 2024. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी महायुतीने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राबवलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कमालीची गेम चेंजर ठरली असून या लाडक्या बहिणींनी विधानसभा निवडणुकीत महायुतीवर मतांची बरसात करीत सत्तेची ओवाळणी दिली आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील शिवसेना शिंदे गट आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीने २३० पेक्षा अधिक जागा जिंकत नवा राजकीय इतिहास रचला आहे. महायुतीच्या महालाटेत महाविकास आघाडीचा अक्षरशः धुव्वा उडाला आहे. महायुतीत एकट्या भाजपने १३२हून अधिक जागा जिंकल्या. १९९० नंतर वैधानसभा निवडणुकीत सार्वधिक जागा जिंकणारा भाजप हा पहिला पक्ष ठरला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे आव्हान परतून लावत भाजपने २०१४ पासून सलग तिसऱ्यांदा शतकी मजल मारली आहे. २०१४ च्या मोदी लाटेत १२३ जागा जिंकणाऱ्या भाजपने यंदा आश्चर्यकारक विजय मिळवत ऐतिहासिक कामगिरी केल्याने भाजप मुख्यमंत्रीपदावर दावा करणार आहे. भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव सर्वात आघाडीवर असून सोमवारी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन महायुतीकडून सत्तास्थापनेचा दावा केला जाईल. नव्या सरकारचा शपथविधी सोमवारी किंवा मंगळवारी वानखेडे स्टेडियमवर होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!