सर्वात कमी मताधिक्क्य मिळवत मुफ्ती इस्माईल यांचा विजय..

24 प्राईम न्यूज 25 Nov 2024. मुस्लिम बहुल मालेगाव मध्य मतदारसंघात एमआयएमचे विद्यमान आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल व अपक्ष आमदार आसिफ शेख यांच्यात झालेल्या चुरशीच्या लढतीत मौलाना मुक्ती मोहम्मद इस्माईल यांनी अवघ्या १६२ मतांनी विजय मिळवला. राज्यात सर्वात कमी मताधिक्क्याने निवडून येणारे ते एकमेव आमदार ठरले. मालेगाव
मध्य मतदारसंघातून काँग्रेसचे एजाज बेग, निहाल अहमद यांच्या कन्या शान ए हिंद यांच्या उमेदवारीमुळे ष कटारिया मालेगाव मध्यची लढत चौरंगी ठरली. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून १५व्या फेरीपर्यंत अपक्ष आसिफ शेख यांनी आघाडी घेतल्याने मालेगावमधून एमआयएम हददपार होईल, अशी शक्यता वाटू लागली होती. परंतु, १५व्या फेरीनंतर आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांनी शेख यांच्या आघाडीला सुरूंग लावत आघाडी घेतली. क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारी ही लढत ठरली. विधानसभा निवडणुकीत प्रचाराच्या अंतिम टप्प्यात मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांची प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांना मुंबईत रूग्णालयात दाखलकरावे लागले. याचा परिणाम निवडणूक प्रचारावर होण्याची शक्यताही व्यक्त केली जात होती. परंतु, आजारपणामुळे त्यांना सहानुभूती मिळाली. सर्वोच्च धार्मिक पद, ईदगाहचे ईमाम, शहरातील मतदारांमध्ये असलेला आदर, धार्मिक पगडा, गुन्हेगारीला प्रखर विरोध या त्यांच्या जमेच्या बाजू ठरल्या.