इकरा वेल्फेअर सोसायटी धरणगाव येथे हीजामा शिबिराचे आयोजन..

24 प्राईम न्यूज 25 Nov 2024. 24 नोव्हेंबर 2024 रोजी मोहल्ला भडंगपुरा येथील मशिदीच्या मैदानात 2 दिवसीय हिजामा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये धुळे शहरातील डॉ. ओवेस खान आणि डॉ. मोहम्मद जाहिद यांनी हे काम केले, सकाळी 10 ते 9. या शिबिरात धरणगाव शहरातील आलिम ,उलेमा, तसेच धरणगाव शहरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. लोकांची गर्दी सकाळपासून सायंकाळ पर्यंत सुरूच होती.
हे शिबीर यशस्वी करण्यासाठी इकरा वेलफेअर सोसायटीचे पदाधिकारी व मोहल्ला भडंगपुरा मस्जिद पंच कमिटीचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.