जळगाव जिल्ह्याला मंत्रिपदाची उत्सुकता.

24 प्राईम न्यूज 26 Nov 2024.
जळगाव जिल्ह्याने महायुतीला भरभरून मते दिल्यानंतर अकरा जागांसाठी त्यांचे अकराही उमेदवार निवडून आले आहेत. जिल्ह्यातून महायुतीचे प्रथम तीन मंत्री होते. मात्र नवीन मंत्रिमंडळात आता कुणाकुणाला पुन्हा संधी मिळते, जिल्ह्यातील कोणते नवे चेहरे मंत्री मंडळात येतात या बाबत जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू झाली असून काहींनी मंत्रिपदासाठी लॉबिंग करण्यास सुरुवात केली आहे.
जळगाव जिल्ह्याला महायुतीने तीन मंत्रिपदे दिली. यात भाजपचे ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन, शिंदे गटाचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि अजित पवार गटाचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांचा समावेश होता. आता भाजपचे गिरीश महाजन हे सातव्यांदा निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांचा मंत्रिमंडळात समावेश निश्चित होणारअसल्याचे समजते. शिंदे गटाचे गुलाबराव पाटील हे जळगाव ग्रामीणमधून चौथ्यांदा निवडून आले असून त्यांना देखील पुन्हा मंत्रिमंडळात निश्चित स्थान मिळू शकते. मात्र अनिल भाईदास पाटील यांना पुन्हा संधी मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.