फडणवीसच मुख्यमंत्री, फक्त घोषणाँ बाकी ! -मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भाजपश्रेष्ठींनी दिली ७२ तासांची मुदत. ■ केंद्रात मंत्रीपद घ्या किंवा राज्यात उपमख्यमंत्री व्हा. -भाजप

0

24 प्राईम न्यूज 27 Nov 2024

महाराष्ट्रातील भाजप नेते आणि आमदारांचा उत्स्कृतं पाठिंबा, पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा आग्रह, त्याचसोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने चर्चेअंती दिलेला हिरवा कंदील या जोरावर दिल्लीतील भाजपश्रेष्ठींनी देवेंद्र फडणवीसच राज्वाचे नवे मुख्यमंत्री असतील बावर शिक्कामोर्तब केल्याचे खात्रीलायक माहीती मिळाली आहे. पुढच्या ७२ तासांमध्ये वासंदभांतोल औपचारिक घोषणा होणेच शिल्लक असून नव्या मंत्रिमंडळाच्या फॉर्म्युल्यावर अंतिम चर्चा सुरू असल्याचे समजते.

महायुतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणूक लढवली होती. लाडकी चहीण बोजनेसह लोकप्रिय योजनांची अंमलबजावणी, प्रचारसभांसह महायुतीचे आमदार निवडून आणण्यातील त्यांचे योगदान लठान घेऊन माजपश्रेष्ठींनीही शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंद यांना मानाचे स्थान देण्याचे ठरवले आहे. देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी निवड करतानाच भाजपश्रेष्ठींनी मुख्यमंत्रीपदासाठी अडून बसलेले एकनाथ शिंदे यांच्यासमोर २ पर्याय ठेवले आहेत. राज्यात उपमुख्यमंत्रीपद स्वीकारून फडणवीसांच्या नेतृत्वाखाली काम करा अथवा केंद्रात मंत्रीपद घ्या, असे हे २ पर्याय आहेत. या २ पर्यायांपैकी एका पर्यायाची निवड करण्यासाठी भाजपश्रेष्ठींनी एकनाथ शिंदे यांना पुढील ७२ तासांची मुदत दिल्याचे समजते. महाराष्ट्र विधानसभा v भाजपच्या विक्रमी १३२ जागा निवडून आल्या आहेत. याआधी २०१४ च्या मोदी लाटेत भाजपने १२२ जागा जिंकल्या होत्या, तर २०१९ मध्ये भाजपचे १०५ जण निवडून आले होते.

भाजपश्रेष्ठींनी दिलेल्या २ पर्यायांपैकी एकही पर्याय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अद्याप तरी निवडलेला नसल्याचे समजते. शिंदे केंद्रात जाण्यास उत्सुक नाहीत. त्याऐवजी आपले चिरंजीव खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना राज्यात उपमुख्यमंत्री करा आणि मला महायुतीचा निमंत्रक (कन्व्हेयर) नेमा, अशी अट एकनाथ शिंदे यांनी भाजपश्रेष्ठींना घातल्याचे समजते. आता एकनाथ शिंदे भाजपश्रेष्ठींचे पर्याय मान्य करतात की भाजपश्रेष्ठी एकनाथ शिंदेंची अट मान्य करतात याचा उलगडा ७२ तासांमध्येच होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!