धार ग्रा.पं. अपहारप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल..

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर धार येथील ग्रामपंचायतीत विविध विकास कामाचा मोबदला देताना ग्रामपंचायत रेकॉर्ड ला धनादेश मक्तेदाराच्या नावे दाखवण्यात आला असून प्रत्यक्ष धनादेश सरपंच पती व मुलगा यांच्या नावे वटल्याने न्यायालयाच्या आदेशाने सरपंच, ग्रामसेवक, सरपंच पती, मुलगा आणि मक्तेदारांसह सात जणांवर अपहार व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धार येथील माधव दंगल पाटील यांनी केलेल्या तक्रारीनुसार न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. धार येथे २०१५ ते २०१९ च्या काळात सरपंच सुरेखा यशवन्त पाटील आणि ग्रामसेवक महेश नथु ठाकूर यांनी विविध विकासकामे केल्यावर बिल अदा करताना ग्रामपंचायत रेकॉर्डला धनादेश वरद कॉम्प्युटर, रवींद्र विनायक पाटील, शेख शाहरूख शेख मोहरोद्दीन यांच्या नावाने दर्शवले आहेत. प्रत्यक्ष धनादेश बँकेतून सरपंच पती यशवंत शंकर पाटील, मुलगा अक्षय यशवंत पाटील यांच्या नावाने वटले आहेत. रक्कम एक लाखापेक्षा अधिक असताना ई निविदा काढली नाही म्हणून माधव दंगल पाटील यांनी पंचायत समिती व मारवड पोलीस स्टेशनला तक्रार केली होती. मात्र दखल न घेण्यात आल्याने तक्रार दाखल केली होती. त्यानुसार सात जणांवरगुन्हा दाखल केला आहे.