मनपा शिक्षण मंडळ कर्मचारी विना सुरू… कर्मचारी नियुक्तीची मानियार बिरादरीची मागणी…

जळगाव (प्रतिनिधि) जळगाव महानगरपालिका अंतर्गत महानगरपालिका शिक्षण मंडळ चे कार्यालय सुरू असून त्या ठिकाणी मागील २० जानेवारीपासून कार्यालयात लिपिक, पर्यवेक्षक किंवा अधीक्षक नाही.
सरोदे नामक पर्यवेक्षक हे ३१ जानेवारीला निवृत्त होणार होते त्यापूर्वी त्यांना २० जानेवारी रोजी कार्यालयीन काम करत असताना हृदयविकाराचा झटका आल्याने ते आयसीयू मध्ये ऍडमिट होते तेव्हापासून शिक्षण मंडळात फक्त शिपाया व्यतिरिक्त कोणीही जबाबदार लिपिक, पर्यवेक्षक, अधीक्षक किंवा शिक्षण अधिकारी त्या ठिकाणी नाही.
वास्तविक पाहता त्या ठिकाणी मनपा अंतर्गत सुरू असलेल्या सर्व शाळेतील शिक्षकांचे महत्त्वाचे डॉक्युमेंट, सेवा पुस्तके, पगार पत्रके, पेन्शन ची व इतर शैक्षणिक अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे हाताळण्यासाठी त्या ठिकाणी कोणीही कर्मचारी नाही.
माहिती अधिकारात स्वतः शेख यांनी माहितीचा अर्ज दिला असल्याने त्या ठिकाणी अधिकारी वा कर्मचारीच नसल्याने माहिती मिळत नाही.
सदर बाबत फारुक शेख अध्यक्ष जळगाव जिल्हा मानियार बिरादरी यांनी तातडीने माननीय आयुक्त यांच्याकडे लेखी तक्रार पाठवली असून सहाय्यक आयुक्त शिक्षण विभाग सुनील गोराणे यांना सुद्धा तक्रारीची प्रत दिलेली आहे तरी सदर शिक्षण मंडळात कायमस्वरूपी जबाबदार लिपिक, पर्यवेक्षक व अधीक्षक यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी जळगाव जिल्हा मुस्लिम मन्यार बिरादरीने केलेली आहे.