अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर तर्फे लोक वर्गणी रद्दबातल व पाणीपट्टी वर व्याज आकारणी करू नये याबद्दल अमळनेर नगर परिषदे कडे मागणी..

0

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर-दिनांक १७ डिसेंबर २०२४ अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने अमळनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री तुषार नेरकर साहेब यांना निवेदन देण्यात आले त्या निवेदनात म्हटले आहे की—-
1)अमळनेर नगरपरिषद गेल्या अनेक वर्षापासून लोक वर्गणी चे नावाखाली न.पा. करदात्यांकडून मोठ्या प्रमाणात कर वसूली करीत आहे. सदर नागरिकांवर लादलेली कर वसुली ही अन्यायकारक व बळजबरीची आहे व ती का आकारली जात आहे याचे कोणतेही सबळ कारण नगर परिषदेकडे नाही. तरी ती रद्द करण्यात यावी.

२) अमळनेर नगरपरिषद सन २०२४-२०२५ या वर्षापासून पाणीपट्टीच्या वार्षिक शुल्कात आर्थिक वर्ष 31 मार्च अखेर असताना , 31 डिसेंबर पासूनच २% दराने व्याज आकारणी करीत आहे . ती अन्यायकारक व जबरदस्तीची नागरिकांवर लादलेली आहे. नागरिकांमध्ये या बाबतीत तीव्र असंतोष आहे. तरी आपण पाणीपट्टी करा (Water Cess) वरील आकारण्यात येणाऱ्या व्याज/शास्ती रद्द करावी. अशी मागणी त्यात करण्यात आलेली आहे या प्रसंगी मुख्याधिकारी श्री तुषार नेरकर साहेब यांनी अ. भा.ग्राहक पंचायतीने दिलेले निवेदनातून लोक वर्गणी व पाणीपट्टी वरील व्याज न आकारणे बाबत आम्ही सकारात्मक असा निर्णय घेऊ असे आश्वासन दिले. नागरिकांनी वेळेवर न. पा.कर नियमित व वेळेवर भरावा याकरता अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने जन जागृती करून आम्हास सहकार्य करावे असे विनंती वजा आवाहन त्यांनी केले.याप्रसंगी उपमुख्य अधिकारी श्री चव्हाण हे सुद्धा उपस्थित होते. तसेच अ भा ग्राहक पंचायत अमळनेरच्या अध्यक्षा सौ ‌स्मिता चंद्रात्रे, एडवोकेट भारती अग्रवाल, महिला प्रांत प्रमुख,सौ ज्योती भावसार तालुका संघटक, सौ कपिला मोठे कार्यकारी सदस्य मकसूद बोहरी जिल्हा सहसंघटक,विजय शुक्ल
बँकिंग व सायबर प्रमुख,सुनील वाघ
जिल्हा ऊर्जा प्रमुख ,अरविंद मुठे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. अशी माहिती पी आर ओ सौ मेहराज बोहरी‌ कळवितात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!