मराठी अभिनेत्री अलका कुबल यांचेहस्ते सुर्योदय ज्येष्ठ नागरीक संघाचा सन्मान..—- सुर्या फाऊंडेशनच्या नोबल पुरस्काराने एरंडोलचे ज्येष्ठ नागरीक भारावले..

0

एरंडोल (प्रतिनिधी) – मराठीतील ज्येष्ठ अभिनेत्री तथा माहेरची साडी फेम अलका कुबल यांचेहस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत एरंडोलच्या सुर्योदय ज्येष्ठ नागरीक संघास सुर्या फाऊंडेशनचा पुरस्कार-सन्मानपत्र पाळधी येथे दि. 3 रोजी मिळाल्याने ज्येष्ठ नागरीक भारावले.
पाळधी येथील श्रीसाई बाबा मंदिर परिसरातील भव्य पटांगणावर संपन्न झालेल्या कार्यक़्रमाप्रसंगी अलका कुबल यांचेसह श्रीसमर्थ गृपचे अध्यक्ष मनोज पाटील, जिल्हा शिक्षणाधिकारी विकास पाटील, कॅन्सरतज्ञ डॉ. चांडक यांच्या उपस्थितीत पुरस्कार-सन्मानपत्र देण्यात आले. सदरप्रसंगी सुर्योदय ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष तथा निवृत्त तहसिलदार अरूण माळी, सचिव विनायक कुळकर्णी, उपाध्यक्ष जाधवराव जगताप, संचालक गणेश पाटील, नामदेवराव पाटील, कवी निंबा बडगुजर, विश्वनाथ पाटील, प्रा. शिवाजीराव अहिरराव उपस्थित होते.
सदरप्रसंगी ज्येष्ठ नागरीक संघाच्या कार्याचा गौरव करण्यात आला. विविध उपक्रम, आरोग्य, नेत्र शिबीर, शासकीय सवलती आदींची माहिती आयोजकांनी दिली. सुर्या फाऊंडेशन तथा नोबलच्या अध्यक्षा अर्चनाताई सुर्यवंशी आणि प्रशांत सुर्यवंशी, स्वामी समर्थ गृपच्या प्रतिक्षाताई पाटील आदींनी ज्येष्ठ नागरीकांना शुभेच्छा दिल्यात. कार्यक्रमप्रसंगी इंग्लीम मेडियम स्कूलच्या मुलांनी सादर केलेल्या मनोरंजनाच्या कार्यक्रमांनी उपस्थित भारावले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!