नशा मुखालीफ मोहीमे अंतर्गत मुस्लिम तरुणांच्या क्रिकेट स्पर्धा-आठ संघांचा सहभाग…

जळगाव (प्रतिनिधि) जिल्ह्यात प्रथमच मुस्लीम समुदायाच्या भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन युथ ऑफ जळगाव तर्फे जी.एस. ग्राउंडवर करण्यात आले असून या स्पर्धा रिफॉर्मेशन कप या नावाने दि.४ फेब्रुवारी पासून सुरू करण्यात आले असून ५ फेब्रुवारी ला रात्री समारोप आहे.
साखळी पद्धतीने सामने
८ संघा चे दोन गट असून प्रत्येक संघ हा आपल्या गटात ३ सामने खेळत आहे. सकाळी ८ ते रात्री १० पर्यंत या स्पर्धा सुरू आहेत. रविवारी रात्री स्पर्धेचा अंतिम सामना होईल व पारितोषिक समारंभ होणार आहे.
स्पर्धेचा मुख्य उद्देश
जळगाव शहरातील तरुणांना कोणत्याही प्रकारच्या व्यसना पासून रोखणे, एकमेकांशी जोडणे, आरोग्य साठी फिटनेस व खेळांचे महत्व पटवून देणे, संयम आणि उत्साह जागरूक करणे, संघ भावना वाढविण्याच्या दृष्टीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

उदघाटन, भेट व स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू पुरस्कार वितरण

स्पर्धेच्या उदघाटन आणि स्पर्धेदरम्यान मुफ्ती अतिक उरहमन, अ. करीम सालार, अ. एजाज़ मलिक, मुफ्ती हारून नदवी, गनी मेमन, फारूक शेख, नदीम मलिक, इब्राहीम पटेल, शकील रंगरेज, रिज़वान खाटिक, अनवर सिकलगार, शोएब खान, यासिन मुलतानी, इकबाल मिर्झा, तय्यब शेख सर आदी मान्यवरांनी भेट दिली व पारितोषिके वाटली.
स्पर्धा यशस्वी ते साठी प्रयत्नशील तरुणाई
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी रेहान खाटीक, अडव्होकेटआमिर शेख, शारिक शेख, जकी अहमद, आसिफ मिर्ज़ा, नदीम खान, शोएब, बागवान, शोएब खान, अलफैज़ पटेल, सद्दाम पटेल आदी परिश्रम घेत आहेत.
स्पर्धेचे शनिवारचे सामनावीर
रफिक शेख, फिरोज शेख, मुजाहिद जहागीरदार, दानिश खान, असरार अली, सारीक शेख, निहाल मलिक व सईद शेख
*आज रविवारी सकाळी ८ वाजे पासून होणारे सामने*
१)ए जी एम ११ वि एम ब्रौस यादगार लायन
२)मुलतानी हिरोज वी मोबाइल.कॉम वॉरियर्स
३)रेडियांस राईडर वि ए यु सिकलगर क्रिकेट कल्ब
४) रंग्रेज शॉपी बॉईज वि वसीम बापू ११
५) उपांत्य फेरी क्र १
६)उपांत्य फेरी क्र २
७) अंतिम फेरी
फोटो
शनिवारी स्पर्धेतील उत्कृष्ट ८ खेळाडू सोबत मुख्य अतिथी क्रीडा संघटक व मार्गदर्शक फारूक शेख,नगरसेवक इब्राहिम पटेल, नदीम मलिक, यासिन मुलतानी, इक्बाल मिर्झा,तय्यब शेख व मागे आयोजक समिती आदी दिसत आहे