विमान प्रवासात एकाच बॅगेला मुभा..

24 प्राईम न्यूज 26 Dec 2024.
नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोने हँडबॅगविषयक धोरणात बदल केला आहे. नव्या धोरणानुसार आता प्रवाशांना फ्लाईटमध्ये फक्त एकच हँडबॅग जवळ बाळगता येईल. हा नियम देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही विमानसेवांसाठी लागू होईल. फ्लाईटच्या प्रीमियम किंवा इकॉनॉमी क्लासमध्ये प्रवास करणारे प्रवासी ७ किलो वजनाची फक्त एक केबिन बॅग घेऊन जाऊ शकतील. एवढेच नव्हे तर सोबत ठेवण्याच्या बॅगेचे आकारमानही निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार केबिन बॅगेची उंची ५५ सेमी, लांबी ४० सेमी आणि रुंदी २० सेमीपेक्षा जास्त नसावी. बिझनेस क्लासच्या प्रवाशांसाठी ७ किलोऐवजी १० किलो वजनाची मर्यादा असेल.